वाईकरांसाठी खुशखबर : लोकशोधक न्यूजचे संकेतस्थळ सुरू, आता प्रत्येक बातमी थेट तुमच्या मोबाईलवर

वाई : वाई आणि सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचा आवाज बनण्यासाठी लोकशोधक न्यूजचे अधिकृत संकेतस्थळ आजपासून सुरू झाले आहे.

वाई, महाबळेश्वर, सातारा, पाचगणी, खंडाळा परिसरातील ताज्या बातम्या, शेती, पाणी प्रश्न, रस्ते, आरोग्य, शिक्षण, राजकारण आणि स्थानिक घडामोडी आता लोकशोधक न्यूजवर वाचायला मिळणार आहेत.

लोकशोधक न्यूजचा उद्देश एकच आहे – खरी बातमी, थेट बातमी आणि लोकांच्या हिताची बातमी. कोणतीही बातमी असेल तर नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लोकशोधक न्यूजच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकशोधक न्यूज – लोकांचा शोध, लोकांसाठी बातमी.